प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, कोरपणा राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे मान्यवराच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, कोरपना जिल्हा,चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर “विकसित भारत व मतदान जागृतीसाठी युवाशक्ती” या संकल्पनेवर आधारित दिनांक 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हेटी तालुका कोरपणा, जिल्हा चंद्रपूर येथे होत आहे. सदर शिबिराचे उद्घाटन मा. दौलतराव भोंगळे सेवानिवृत्त प्राचार्य तथा संचालक, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्रीधर रावजी गोडे यांनी यावेळी शिबिरार्थी व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गावातील समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्याकरिता विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. यामुळे शिबिराचा उद्देश सफल होईल कार्यक्रमाचे उद्घाटक भोंगळे सर यांनी शिबिरार्थींना आव्हान केले की, शिबिरार्थ्यांनी सेवाभावी वृत्ती जोपासली पाहिजे तसेच श्रम संस्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जडणघडण होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेटी चे मुख्याध्यापक यांनी शिबिरास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. सुखदेवे यांनी केले या कार्यक्रमास कवडू पा. बोरडे, नानाजी पा. साखरकर,सौ संगीता ढवस, उपसरपंच दिनेश वराडकर,जरीले पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी, शिबिरार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ. राजेंद्र देवाळकर व आभार सहकार्यक्रम अधिकारी प्रा. राजू मेश्राम यांनी मानले.



