सुधिर मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार – भाजपची दुसरी यादी जाहीर
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी जाहिर करण्यात आली असुन ह्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचाही समावेश असुन चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रामधुन दिल्ली वारी करण्यासाठी पक्षाने राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
ह्या क्षेत्राच्या उमेदवारीसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे पुन्हा एकदा इच्छुक होते मात्र यंदा पक्षाने राज्याचे मंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांना संधी दिली आहे. सुधीर मुनगंटीवार ह्यांनी ह्यापूर्वी दोन वेळा चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार राहिले आहे मात्र त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
सुधीर मुनगंटीवार ह्यांनी जाहीरपणे आपण राज्यातच राहण्यास इच्छुक असुन लोकसभा निवडणूक लढविण्यास आपला रस नसल्याचे सांगितले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्ली वारी केली आणी तेव्हाही त्यांनी लोकसभा लढविण्यास इच्छुक नसल्याचे विधान केले होते.
काही लोकांनी भाजपात चलबिचल निर्माण करण्यासाठी मुद्दाम वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर भाजपा प्रवेश करून लोकसभा लढणार असल्याच्या अफवा पसरविल्या होत्या मात्र भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत चंद्रपूर मधुन सुधिर मुनगंटीवार ह्यांच्या नावाची घोषणा झाल्याने सर्व अफवांना विराम मिळाला आहे.