ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निखिल बोबडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत क्रीडा अधिकारीपदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत तालुका क्रीडा अधिकारीपदी श्री. निखिल शिला उत्तमराव बोबडे यांची निवड झाली आहे, कठोर परिश्रम, समर्पण आणि क्रीडा क्षेत्रातील अमूल्य योगदानामुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे.

श्री. निखिल बोबडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांतून युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. त्यांच्या या यशाने केवळ वैयक्तिक यश नव्हे, तर तालुक्याला अभिमानाचा क्षण दिला आहे.

आपल्या कार्यक्षमतेने आणि समर्पणाने ते निश्चितच क्रीडा क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करतील. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि यशस्वी भविष्यासाठी वडील श्री. उत्तमराव बोबडे, काका श्री शंकरराव वैद्य, सेवानिवृत्त प्राचार्य शरद जोगी, वरोरा स्पोर्टस फाउंडेशन आणि लोकशिक्षण संस्था वरोडाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य यांनी निखील चे अभिनंदन करुण भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये