तरुणानी परिश्रम करुण स्पर्धा परीक्षेत यश संपादन करा
आयएएस अधिकारी रंजित यादव यांचे प्रतीपादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
स्टूडेंट फोरम ग्रुप कोरपना द्वारा आयोजीत तीन दिवसीय शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम चे उदघाटन समारोहात मार्गदर्शन करताना आयएएस अधिकारी कोरपना येथील तहसीलदार रंजित यादव साहेब यांनी विद्यार्थीना मोलाचा सल्ला दिला की जिद्द, कठोर परिश्रम करुण स्पर्धा परीक्षाचे शिखर गाठा यश तुमचेच. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते शिवाजी महाराज भारताचे राष्ट्रपती स्व.एपीजे अब्दुल कलाम गजाननराव बोरडे गुरूजी यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमास सत्कार मूर्ति प्रमुख अतिथि नागपुर विभाग शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अड वामनराव चटप साहेब मार्दर्शक सत्कारमूर्ति ब्रिटिश सरकार ची चेव्हनिंग स्कॉलरशिप प्राप्त ऐडवोकेट दीपक चटप, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरूण पा. नवले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी समाज कल्याण सभापति नीलकंठराव कोरांगे ज्येष्ठ नागरिक डॉ भास्करराव मुसळे, कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक सुनिल बावने गणेश गोडे माजी नगरसेवक सुभाष तुरानकर रमाकांत मालेकर उत्तमराव मोहितकर, सेवानिवृत्तिपर सत्कार मूर्ति प्रदीप नागोसे, विजय मसे, दिगांबर खडसे, हेपट, साधु बावने तसेच प्राचार्य डॉ. विजय हेलवटे प्रा. दिलीप मोरे प्रभाकर पारखी एस. पी. यादव विजय धानोरकर अमोल कोल्हे यांची मंचावर उपस्थिति होती.
तर बालगोपाल व महीला पुरुष युवक यांची प्रचंड उपस्थिति होती. प्रास्ताविक प्राचार्य संजय ठावरी सर यानी केले आमदार अडबाले सर यांनि जिल्हातिल एकमेव कोरपना परिसरातिल स्टुडेंट फोरम च्या युवकांच्या कार्याचे उपक्रम बाबत कौतुक केले व यूवकांच्या कल्याणासाठी नेहमि मदती चा हात देन्याची घोषणा केली, दीपक चटप यानी युवकाना मार्गदर्शन केले अध्यक्षिय भाषणातून चटप यानी मोलाचे विचार मांडले,तर आभार अक्षय बहरे यानी मानलें . उदघाटन कार्यक्रमानंतर नृत्य स्पर्धा पार पडल्या, आयोजनसाठी स्टूडेंट फोरम ग्रुप च्या सर्व संघटकानी प्रयत्न केले.