ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरीच्या विकासासाठी सदैव कटिबध्द आहे – विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार

ब्रम्हपूरी नगरपरिषद क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

      ब्रम्हपूरी नगरपरिषदेने विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचा कार्यक्रम ही एक अनोखी संकल्पना असुन कार्यालयातील दैनंदिन कामातील ताणतणाव व कामातुन उसंत मिळत एक नवी उर्जा या क्रिडा स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना मिळणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात ब्रम्हपूरीचे नाव अग्रक्रमावर आहेच परंतु आता क्रीडा क्षेत्रात देखील ब्रम्हपूरी पुढे जात आहे. ब्रम्हपूरी शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे प्रगतीपथावर असून विकासकामांच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलविण्यास मी सदैव कटीबध्द आहे असे प्रतिपादन राज्याचे विरोधीपक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रम्हपूरी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

यावेळी मंचावर नगराध्यक्षा रिताताई उराडे, न.प. उपाध्यक्ष अशोक रामटेके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बांधकाम सभापती विलास विखार, आरोग्य सभापती बाला शुक्ला, महिला व बालकल्याण सभापती सुनिताताई तिडके, तहसीलदार उषा चौधरी, मुख्याधिकारी अर्शिया जुही, नगरसेवक हितेंद्र राऊत, नगरसेवक सागर आमले, नगरसेवक मनोज वठे, नगरसेविका सरिताताई पारधी, नगरसेविका निलीमाताई सावरकर, नगरसेविका अंजलीताई उरकुडे, नगरसेविका सपनाताई खेत्रे, नगरसेविका अर्चनाताई खंडाते, नगरसेविका पुष्पा गराडे, जलतरणपटू शिवराज मालवी यांसह अन्य मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना विरोधीपक्षनेता विजय वडेट्टीवार म्हणाले की, ब्रम्हपूरी क्रिडा क्षेत्रात अग्रेसर व्हावी म्हणून आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असुन नुकतीच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा शहरात आमच्या पुढाकाराने आयोजित केली होती. तालुका क्रीडा संकुलाच्या विकासासाठी पुन्हा 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याठिकाणी सर्व क्रिडा प्रकाराचे मैदान तयार होणार आहेत. सोबतच शहरातील लेंडारी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याठिकाणी बोटींग सुरू करण्यासंदर्भात बाब विचाराधीन आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. शहरात विविध विकासकामे मंजूर करून दिल्याबद्दल यावेळी नगरपरिषदेच्या वतीने विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार देखील करण्यात आला.
नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स़ोबतच यावेळी नगरपरिषदेच्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी तर सूत्रसंचालन अर्चना खंडाते यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये