ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे. सावंगी (मेघे) पोलीसांकडुन चोरीचा गुन्हा उघड

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

यातील फिर्यादी दिनेश अखिलेश्वर शर्मा वय 61 वर्ष रा. गांधी चौक ग्रामचान ता. चानन जिल्हा बाका (बिहार) ह.मु. भगतसिंग चौक राधाकृपा बिल्डींग बाजने चौरे हाउस रामनगर वर्धा यांचे केशर प्लॉटमध्ये ठेवुन असलेले 1) लोखंडी केशर ब्लेड 2) रेज पाने 3) बिटर (लोहा तोडनेवाला) 4) स्प्रिंग पट्टा 5) लोखंडी प्लेट असा जु. किं 20,000/रु चा माल दिनांक 17.12.2023 ते 18.12.2023 चे दरम्याण कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेला अशा फिर्यादीच्या तोडी रिपोर्ट वरुन पोस्टेला अप क. 717/23 कलम 379 भादवी अन्वये सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर गुन्हा दाखल होताच आरोपी व मुद्देमालाचे शोधार्थ पोलीस पथक गेले असता, यातील नमुद आरोपी यांना ताब्यात घेवुन गुन्हयासबंधाने विचारपुस केली असता, त्यानी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने व त्यांना नांव व पत्ता विचारला असता त्यांनी आपले नांव 1) गणेश सुर्यचंद्र पवार वय 19 वर्ष रा. पारधी बेडा भुगांव 2) कुणाल गजानन सराटे वय 20 वर्ष रा. वार्ड नं 03 भुगांव 3) आशिष अनंतराव थुल वय 25 वर्ष रा. वार्ड नं 03 भुगांव ता.जि. वर्धा यांनी सदर गुन्हा केल्याने आरोपीजवळुन चोरीस गेलेला 1) लोखंडी केशर ब्लेड 2) रेज पाने 3) बिटर (लोहा तोडनेवाला) 4) स्प्रिंग पट्टा 5) लोखंडी प्लेट असा एकुण जु. किं 20,000/रु चा माल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक नूरुल हसन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सांगर कवडे, साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर साहेब,, यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संदिप कापडे सा, ठाणेदार, पोलीस स्टेशन सावंगी (मेघे), यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार पोहवा सतीश दरवरे, निलेश सडमाके, भुषण निघोट, पोना अनिल वैद्य, स्वप्नील मोरे, पोशि निखील फुटाणे, अमोल जाधव सर्व नेमणुक पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये