गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट शहरात देशी दारू कारसह 3 लाख 84 हजारावर मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 21/12/2023 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, तेलंगखडी तहसील वार्ड हिंगणघाट येथे राहणारा प्रज्वल सुनील कडू हा आपल्या घरासमोर मारुती सुझुकी कार क्रमांक एम एच 31 सी एन 7309 मध्ये अवैधरित्या देशी दारू बाळगून त्याची चोरटी विक्री करीत आहे अशा माहितीवरून त्याच्यावर दारूबंदी प्रो. रेड केला असता आरोपी नामे प्रज्वल सुनील कडू वय 20 वर्षे रा. तेलंगखडी तहसील वार्ड हिंगणघाट यांच्या ताब्यातून देशी दारूने भरलेल्या 90 एम एल च्या प्रीमियम कंपनीच्या 345 सीलबंद शीशा किंमत 34,500/- रुपये व एक मारुती सुझुकी कंपनीची एम एच 31 सी एन 7309 कार किंमत 3,50000/- रुपये असा एकूण 3,84,500/- रुपये चार माल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्षनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देषाप्रमाणे पोलीस अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, अरविंद इंगोले सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये