ताज्या घडामोडी

ताडोबात पुन्हा वाघाचा मृत्यु – खाजगी जागेत वाघ मृतावस्थेत आढळला

वाघाचा मृत्यु झुंजीत की शिकारीसाठी?

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

व्याघ्र संवर्धनासाठी जगप्रसिध्द असलेल्या ताडोबा व्याघ्र अभयारण्यात मागील काही दिवसांत वाघांच्या मृत्यूच्या घटना उघडकीस येत असल्याने वन विभाग तसेच वन्य जीव प्रेमी चिंता व्यक्त करत असतानाच ताडोबाच्या बफर क्षेत्रात एका खाजगी मालकीच्या आवारात जखमी वाघाचा मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असुन पुर्ण वाढ झालेल्या ह्या वाघाचा मृत्यु इतर वाघ अथवा प्राण्यांशी झालेल्या झुंजिमुळे की शिकारीच्या उद्देशाने असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार ताडोबाच्या बफर क्षेत्रातील बोर्डा बिटातील घंटा चौकीजवळील एका खासगी जागेत पूर्ण वाढ झालेल्या टी-५१ या वाघाचा मृतदेह आढळल्याने वन विभागामध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, वाघाच्या संपूर्ण शरीरावर जखमा आढळल्या असून अती रक्तस्त्रावामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. वाघाच्या शरीरावर जखमा आढळल्याने शिकारीचा संशयही बळावला आहे.

वनविभागाचे पथक घंटा चौकी परिसरात गस्त करीत असताना त्यांना खासगी जागेत मृत वाघ आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होवून मृतदेह ताब्यात घेत पाहणी केली. शवविच्छेदनानंतर वाघाचे दहन करण्यात आले आहे. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण कळावे यासाठी वाघाचे अवयव प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये