ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती येथे क्रांती गुरु लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  जिवती येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे सामाजिक प्रतिष्ठान च्या जागेवर आद्य क्रांति गुरु लहुजी साळवे यांचे 229 वी जयंती 30 नोव्हेंबर ला उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी 11 वाजता ज्येष्ठ नागरिक भोजू गायकवाड, दत्ताजी तोगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या जयंती समारोहाचे उद्घाटक शाहीर अंकुश जी मोरे अध्यक्ष संभाजी जाधव (सामाजीक कार्यकर्ता तेलंगाना) तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शक एडवोकेट दत्तराज गायकवाड (प्रदेशाध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन) डॉ. कुलभूषण मोरे(जिल्हा सचिव लसाकम चंद्रपूर), देवराव भाऊ भोंगळे (माजी जी प अध्यक्ष), महेशजी देवकते (माजी उपसभापति), केशव गिरमाजी, राजाराम घोडके (तालुका अध्यक्ष लसाकम) जीवति, प्रा. बालाजी मोरे (समता दूत बार्टी)लता ताई डकरे, प्रल्हादजी मदने, भगवान डुकरे, केशव भालेराव, भूषण भाऊ फूसे (बी आर एस अध्यक्ष), आशीष नामवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर संभाजी ढगे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुंटेवाड सर यांनी केले. समाजातील गुणवंत विद्यार्थी नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता आंबटवार, भागवत मोरे, रवी जेवाले, कांबळे जांभळे, चंद्रकांत घोडके, व्यंकटी हरगिले आदिनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये