ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे दि.1 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे, शासकीय रुग्णालय कोरपना येथील समुपदेशक श्री संजय जिवतोडे, रवींद्र भगत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. आशिष पईनकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, प्रा. सचिन कणॅवार,डॉ. राजेश डोंगरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सुरुवातीला झालेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात संस्थेचे सचिव डॉ. अनिल मुसळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. येत्या काही वर्षात आपल्या देशातील एड्स या रोगाबद्दल मोठी जनजागृती झालेली आहे.

त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतातील एड्स होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. परंतु या रोगाचा पूर्णपणे नायनाट अद्यापही झालेला नाही. यासाठी राष्ट्र स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे असे मनोगत डॉ.अनिल मुसळे यांनी व्यक्त केले. यानंतर श्री संजय जीवतोडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. अनिल मुसळे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उदघाटन केले.

ही रॅली तुकडोजी महाराज चौक इथून आल्यानंतर महाविद्यालयात विसर्जित करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. राजेश डोंगरे यांनी केले, तर आभार ग्रंथपाल प्रा. सचिन कणॅवार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुल महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये