ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा तालुक्यातील महिलांची व पुरुषांची आर्थिक लूट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा तालुक्यात सध्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई विकास कल्याण मंडळातर्फे बांधकाम कामगारांना सरकारकडून एक पेटी त्यात बॅटरी टिफिन पाण्याची बॉटल व इतर वस्तू कामगारांना कामाच्या वेळेस लागणारे सेफ्टी बेल्ट ते सुद्धा या पेटीत असते आणि भांड्यांचा संच मिळत असतो.

तेही सर्व मोफत मिळत असतात परंतु चंद्रपूर येथील एका महिलेने कोरपणा तालुक्यात काही महिला व पुरुषांना आपल्या कामावर ठेवून आदिवासी जनता व गोरगरीब यांच्याकडून पेटीसाठी पंधराशे रुपये व भांड्यांचा संच याच्यासाठी दीड हजार आणि 2000 घेतले जातात त्या महिलांनी सर्व कोरपणा तालुक्यात नेटवर्क पसरवले आहे आदिवासी जनतेचा अज्ञानाचा फायदा घेऊन बरेच लूट होत आहे भोळी भाबडी आदिवासी जनता लालचे पोटे जाऊन यांची शिकार होत आहे तरी संबंधित विभागाने लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी कोरपणा तालुक्यातील जनता व महिलावर्ग करीत आहे.

सरकार जनतेसाठी विविध योजना आणून जनतेला समोर जाण्याचे करतो परंतु खऱ्या योजना जनतेपर्यंत मोफत पोहोचत नाही अशी.लूट त्या तरी कोरपना तालुक्यात होत आहे यावर कोणती कारवाई होईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये