ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पलभट्टी देवीच्या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करा व प्रकाश व्यवस्था करा 

नगर परिषदेकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सालाबादाप्रमाणे याहीवर्षी होत असलेल्या पलभट्टी देवीच्या उत्सवासाठी मार्गावरील रस्त्यांची स्वच्छता करावी,तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवून उघड्या नाल्या बंद करुन पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे बाबत चे निवेदन नागरिकांनी नगरपरिषद कडे सादर केले आहे,सालाबादाप्रमाणे याहीवर्षी देऊळगांवराजा शहरातील प्रसिध्द असलेला पलभट्टी देवीचा उत्सव दिनांक ०५/०५/२०२४ रोजी होणार आहे. परंतु पलभट्टी देवीच्या मार्गावरील रस्त्यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. कारण या मार्गावर अनेक ठिकाणी घाण साचलेली असून त्यामुळे भाविकांना त्रास होण्याची शक्यता आहे.

तसेच या उत्सवासाठी गावातील नागरीकांसह बाहेर गावाहून देखील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. पलभट्टी देवीच्या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर गड्डे पडलेले असून नाल्यावरील ढापे नसल्यामुळे नालिमध्ये किंवा खड्ड्यामध्ये पडून अपघात होऊ शकतो, देवीचा उत्सव रात्री असल्याने आवश्यक त्या ठिकाणी मोठे लाईट लावून प्रकाश व्यवस्था करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन नगर परिषदे कडे सादर करण्यात आले आहे.

याप्रसंगी सूरज हनुमंते, ऍड राजू मांटे, बलवंत सिंग बावरे, मुन्ना ठाकूर, विठ्ठल निंबाळकर, प्रथमेश वाघमारे, विनोद शिवरकर, नागेश पवार, साहिल मोगरकर, यश कोठेकर,उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये