गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सात महिण्यापासुन खुनाचे प्रयत्नाचे गुन्हयातील फरार आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 03.12.2022 फिर्यादी नामे प्रशांत उर्फ गोलु प्रसादीलाल ताराचंदी, रा. पुलफैल, वर्धा यांना आरोपी नामे शंकर मोतीलाल छगनकर, वय 55 वर्ष, रा. पुलफैल, वर्धा त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला याबाबत पो. स्टे. वर्धा शहर येथे दिलेल्या तक्रारी वरून आरोपी विरूध्द वर्धा शहर अपराध क्रमांक 1767 / 2022 कलम 307, 34 भादवि अन्वये नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील आरोपी हा घटना तारखे पासुन आपली अटक चुकवुन कोलकत्ता, अकोला अशा मोठया मोठया शहरात राहुन आपले राहण्याची जागा वारंवार बदलवुन आपली अटक चुकवित होता. दिनांक 23.06.2023 रोजी सदर गुन्हयातील पसार आरोपी शंकर मोतीलाल छगनकर, वय 55 वर्ष, रा. पुलफैल, वर्धा हा गोंदीया येथील स्विपर लोकांचे मोहल्यात राहत असल्या बाबत मुखबिर कडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहितीचे आधारे आरोपी शोध कामी गोंदीया येथे जावुन सदर आरोपीचा कसोशीने गोंदीया येथील स्विपर लोक जेथे जेथे राहतात त्या वस्त्या सावळा टोळी, गौतम नगर कचरा वस्ती येथे शोध घेवुन सदर आरोपी बाबत त्याच परीसरात मुखबिर तयार करून सहा तासाचे अथक प्रयत्नाने सदर आरोपी हा सावळा टोळी येथच असल्याचे निष्पन्न झाल्या वरून सापळा रचुन त्यास त्याचे नातेवाईकाचे घरून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीसह वर्धा येथे परत येवुन पुढील कार्यवाही करीता व गुन्हयाचे तपासा करीता पोलीस स्टेशन, वर्धा शहर चे पोउपनी प्रविण पाटील याचे ताब्यात देण्यात आले.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, नूरूल हसन साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक, डॉ. सागर कवडे, मा. पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाख, वर्धा याचे मार्गदर्शनात पोउपनी अमोल लगड, पोहवा सचिन इंगोले, प्रमोद पिसे, नापोकॉ पवन पन्नासे, नितीन ईटकरे, रामकिसन ईप्पर दिनेश बोथकर व गणेश खेवले यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये