ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणजे मिलिंद सुपले – राजाबाळ संगिडवार

प्रा.मिलिंद सुपले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

    भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती व्यावसायिक कनिष्ठ महाविद्यालय सावलीचे पूर्ण वेळ शिक्षक प्रा.मिलिंद सुपले हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाले त्या अनुषंगाने विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार करण्यात आला.

     मिलिंद सुपले हे शैक्षणिक कार्या बरोबरच सामाजिक तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करून समाजाची सेवा करून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली.ते सर्वसमावेशक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी आहेत असे अध्यक्षस्थानावरून भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ पाटील संगिडवार बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,संजय ढवस,श्वेता खरचे,उपस्थित होते.या प्रसंगी मिलिंद सुपले यांच्या ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेच्या आठवणींना विद्यालयातील शिक्षकांनी उजाळा दिला.

      आयोजित कार्यक्रमाच्या संचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्रदीप कोहळे आणि आभार शिक्षिका काजल बारापात्रे यांनी मानले. कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये