Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जि.प. प्राथमिक शाळा खडकी येथे विज्ञान प्रदर्शनी संपन्न

जि.प.प्राथमिक शाळा खडकी,केंद्र-पारडी, पं.स. कोरपना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

दि. १४/१२/२०२४ रोजी जि.प.प्राथमिक शाळा खडकी येथे इयत्ता १ ते ४ च्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विज्ञान प्रयोगांची प्रदर्शनी भरविण्यात आले. सदर विज्ञान प्रदर्शनीला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सदस्यगण उपस्थित होते. तथा विशेष अतिथी म्हणून पारडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री तलांडे सर प्रामुख्याने उपस्थित होते.

   यावेळी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या प्रयोगांची पाहणी करून समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.सदर प्रदर्शनीमध्ये खालील प्रयोग मांडण्यात आले होते.

ठिंबक सिंचन, ज्वालामुखी विस्फोट,हळदीचे कुंकू, कुंकवाची हळद, गणितीय क्रिया, कार्बनडाय आॅक्सआईड ज्वलनास मदत करत नाही, उर्जेची बचत, ओली आगपेटी पेट घेते, अदृश्य नाणी,उष्णता रोधक फुगा,हवेतील आॅक्सीजन तपासणे, फुगा आपोआप फुगतो,पाण्याची घनता

    सदर प्रदर्शनीला पालक वर्ग व गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुमराम सर यांनी केले. केंद्रप्रमुख तलांडे सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून विज्ञान विषयाच्या विविध संकल्पना स्पष्ट करून दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये