शिष्यवृत्ती परीक्षेत जि प टेकामांडवा शाळेचे तेरा विद्यार्थी पात्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवा या शाळेतील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही तेरा विद्यार्थी पात्र झालेले आहेत. जिल्हा परिषद टेकामांडवा ही शाळा विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे नेहमीच चर्चेत असते.
यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ५ वी) परीक्षेत एकूण १३ विद्यार्थी पात्र झालेले आहेत.सर्व पात्र विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दिपक गोतावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पायल कुकडे, गंगाधर पांचाळ,जयश्री घोळवे यांच्या अथक प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.पात्र विद्यार्थ्यांमध्ये पाच विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत हे विशेष यामध्ये तृप्ती फुलचंद तांबरे २२२,कन्हैया नरहरी सोडनर २२०,श्रेया सुभाष तांबरे २१४,जानवी नागनाथ नुनुंचे २०२,संध्या लक्ष्मण आईतवाड २०२,दिव्या निळकंठ हाके १९८,श्रीदेवी किसन सलगर १९८,दिव्या गंगाधर सलगर १९०,देवीका ज्ञानदेव गायकवाड १९०,करण बालाजी आमनर १८८,करण पद्माकर हाके १८२,भानुप्रताप माधव होळकर १५२,हाऊबाई पिराजी श्रीरामे १५० यापैकी बरीच विद्यार्थी विद्यानिकेतन साठी पात्र सुद्धा झालेली आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक लच्चू पवार, शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पालक,गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.