ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रामकृष्ण विद्यामंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

रामकृष्ण विद्यामंदिर व स.म. स्व.भास्कररावजी शिंगणे माध्य विद्यालय दे. राजा आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्सहात संपन्न झाले, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ह.भ.प.डॉ. अनिरुद्धजी महाराज होते,कार्यक्रमाचे उद्घाटक सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज भाऊ कायंदे,होते.

सत्कारमूर्ती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलरावजी म्हस्के बाबा, प्रमुख अतिथी डॉ. रामप्रसाद शेळके,सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, माजी उपसभापती गजानन डोईफोडे,बाजार समितीचे सभापती समाधानी शिंगणे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, माजी सभापती रंगनाथराव कोल्हे, माजी सभापती गजानन पवार, माजी सभापती गणेश गुरुकुल, राजू शिरसाठ, अशोकराव शेळके, दिलीप छोटे, माजी नगराध्यक्ष संतोष भाऊ खांडेभराड,देवराव पारेकर, सरपंच संजय कावळे सदाशिव मुंडे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा व गाण्यांचे सादरीकरण केले, प्रास्ताविक अध्यक्ष विनय भाऊ म्हस्के यांनी केले,सूत्रसंचालन श्री सांगळे सर व कोल्हे सर यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्याध्यापक जी.एल.व्ही. देशमुख यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेऊन पार पडला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये