आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुंभेझरी येथे आरक्षण वर्गीकरण जनजागृती कार्यक्रम संपन्न

यावेळी गुणवंतांचा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- नुकताच १० वी आणि १२ वी चा निकाल लागला असून त्यामध्ये मौजा कुंभेझरी येथील विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सकल मातंग समाजाच्या वतीने कुंभेझरी येथे करण्यात आला. यावेळी १२ वी मध्ये प्राविण्यप्राप्त श्रुती जेवाले,लक्ष्मी वाघमारे, रविकिरण गोतावळे, कृष्णा चव्हाण यांचा तर १० वी मध्ये प्राविण्यप्राप्त श्रुष्टी घोसे, श्रेया जेवाले, अंजली चव्हाण, सलोनी कांबळे

तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या तोगरे, भालेराव तसेच इस्रो चा टूर केलेल्या कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला.

त्यानंतर अनु. जाती आरक्षणाचे वर्गीकरणाबाबतची जनजागृती करण्यात आली. वर्गीकरणावर रमाकांत जंगापले यांनी माहिती दिली, तर या विषयावर सखोल मार्गदर्शन सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक डॉ अंकुश गोतावळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम घोडके यांनी केले, त्यांनी प्रास्ताविकात कुंभेझरी गावचे सुपुत्र डॉ गोतावळे हे राज्यस्तरावर काम करीत असल्याचा अभिमान समस्त कुंभेझरी वासियांना असून त्यासाठी त्यांचा गावाच्या वतीने सन्मान केला. तसेच सर्व गुणवंत विध्यार्थ्यांना भावी यशासाठी शुभेच्या दिल्या.यावेळी गावातील प्रतिष्टीत नागरिक तुकाराम वाघमारे, डॉ पांडुरंग भालेराव,प्रा. सुग्रीव गोतावळे, विजय गोतावळे, संतोष गोतावळे पो. पाटील, लहुजी गोतावळे उपसरपंच, यादव भालेराव, पंढरी घोसे,बापूराव बसवंते, रोहिदास तोगरे,एकनाथ गायकवाड, संजय भालेराव, दत्ता वाघमारे, मारोती पट्टेवाले, शिशुपाल गायकवाड, केशव शिकारे, व्यंकटी कांबळे, बाबू कांबळे, दिगंबर जेवाले व गावातील विध्यार्थी, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम भालेराव यांनी तर आभारप्रदर्शन भानुदास जाधव यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये