ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्या तहसील कार्यालयावर धडकणार पांढरे वादळ

बंजारा समाजाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- बंजारा समाजात होणाऱ्या राजपूत फकीर व शेख या जातीची बोगस घुसखोरीच्या विरोधात, क्रिमिनल जातीचा रेकार्ड न पाहता क्रिमिनल ट्रायीब चा हक्क/दावा बंद करावा,२४ नोव्हेंबर २०१७ चे रक्ताने संबंधित शासन अधिसूचना रद्द करावी, नॉन क्रिमिलियरची अट रद्द करावी, SIT समिती स्थापन करून बोगस घुसखोरी करणाऱ्यावर कार्यवाइ करावी, तालुक्यातील ३३ हजार हेक्टर अतिक्रमीत जमीन धारकांना कायम स्वरूप पट्टे देण्यात यावे.

तसेच जिवती नगर पंचायत मधील पंतप्रधान आवास योजनेतील मंजूर असलेले ६६४ घरकुल बांधकामांना शासनाचे ना हरकत प्रमाण पत्र देऊन घरकुल उपलब्द करून द्यावे अशा अनेक मागण्या घेऊन जिवती तहसील कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीने पांढरे वादळ महामोर्चा चे आयोजन ९ ऑक्टोबर रोज सोमवार ला केले आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे.

असे आवाहन बंजारा ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अमर राठोड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, नगरसेवक ममता जाधव, भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था चे राष्ट्रीय महासचिव अशोक राठोड, प्रा. विश्वनाथ राठोड,माजी जी प सदस्य पंकज पवार, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे चंद्रपूर विभाग प्रमुख सुदाम राठोड, भाजप चे राजेश राठोड, काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष गणपत आडे,गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार, प्रभाकर पवार,अशोक जाधव, गोरसेनेचे तालुका अध्यक्ष सतीश राठोड, बंजारा ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष प्रमेश्वर चव्हाण, भीमराव पवार, गजानन आडे,केशव राठोड,कैलास जाधव, संतोष जाधव,सुनील राठोड, विशाल राठोड, सोनू जाधव, मुकेश चव्हाण, विकास चव्हाण, दयानंद राठोड आदींनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये