ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिमूर नगर परिषद अंतर्गत समस्याचे मुख्यमंत्री यांना दिले निवेदन

चिमूर शहर काँग्रेसने एसडीओ यांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. चिमूर

चिमूर नगर परिषद अंतर्गत अनेक समस्या निर्माण झाल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. नप प्रशासन मात्र डोळेझाक करीत असल्याने या संदर्भात विविध मागण्याचे निवेदन चिमूर शहर काँग्रेस च्या वतीने एसडिओ मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात चिमूर शहराची आठवडी बाजाराची जागा निश्चित करावी, नळ पाईप लाईन खोदकाम मुळे जनतेला त्रास होत असल्याने व्यवस्था करावी,नप ला अंगणवाड्या हस्तातरीत करण्यात याव्या,नप हद्दीतील ग्रामीण भागात नागरिक योजना वंचित रहावे लागत आहे, जीप पस योजना नप हद्दीत राबविण्यात याव्या,वडाळा पैकु ग्राम पंचायत चे दस्तऐवज हस्तातरित करण्यास आदेश द्यावे, शहरातील फोडलेल्या नाल्या दुरस्त कराव्या,पंतप्रधान आवास योजनेचा तिसरा हप्ता द्यावा,नप हद्दीत परिसरात उद्याने करण्यात यावे, मेन रोड वर सुलभ शौचालय करण्यात यावे,नप मध्ये आकृती बंध कर्मचारी नियुक्त करावे,रोजदरी कर्मचारी कायम सेवेत रुजू करावे, एम एस ई बी ने शेतकऱ्यांना पूर्ण वेळ विद्युत पुरवठा करण्यात यावा,नप हद्दीत अतिक्रमण धारकांना पट्टे देण्यात यावे, नप हद्दीत प्रत्येक प्रभागात विद्युत लाईट लावण्यात यावे,मोकाट जनावरे, डुक्कर यांचा बदोबत करण्यात यावा,मुख्य रस्त्यावरील डीवायडी वर स्टील रेलिंग लावण्यात यावी.मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देत असताना चिमूर शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे,माजी सरपंच बाळू बोभाटे, राजू चौधरी,पप्पू शेख,श्रीकांत गेडाम,अक्षय लांजेवार ,विलास डांगे,अभिजित बुरुले,अमोल जूनघरे,प्रीती दिडमुठे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये