ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्याध्यापक श्री. डी. जी. खडसे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा_ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ कोरपणा द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना येथे आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात मुख्याध्यापक श्री डी जी खडसे वा सेवानिवृत्त शिक्षकांचा सेवापुर्ती सत्कार व निरोप समारंभ आयोजित केला

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीधर रावजी गोडे व संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते सेवापूर्ती निमित्त मुख्याध्यापक श्री डी जी खडसे व संगीता खडसे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळेस सेवानिवृत्त शिक्षक श्री बावणे श्री उईके श्री गायधने यांचा सुद्धा सेवानिवृत्ती निमित्त सापत्नीक सत्कार करण्यात आला याप्रसंगी शतक पूर्तीनिमित्त ज्येष्ठ संचालक श्री नामदेव पाटील जोगी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला

यावेळेस मुख्याध्यापक श्री डीजी खडसे यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव मान्यवरांनी केला सहसचिव श्री ए एन कुकडे माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे कोडापे श्री कोवे माजी विद्यार्थी प्रणाली व यश खडसे यांनी मनोगत व्यक्त केले

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री भाऊराव पाटील कारेकार संचालक मंडळ मुख्याध्यापक श्री पी बी बोंडे माजी सरपंच श्री पुंडलिकराव ठाकरे पर्यवेक्षक के डी गुगल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर रावजी गोडे तर उद्घाटक म्हणून विजयराव बावणे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री गणेश गोडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री पी बी बोंडे यांनी केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये