ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लबच्या वतीने हिंदी दिवस कार्यक्रम उत्साहात साजरा

निबंध स्पर्धेत सहभागी शाळेच्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरण

 चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व्दारे स्वर्गीय देवीदास सोनटक्के व स्वर्गीय उषादेवी खंडारकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हिंदी दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी सभागृहात दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दीप प्रज्वलन करून केले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून हिंदी शिक्षिका वैशाली मद्दीवार, चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे उपस्थित होते. मंचावर रोटरी क्लबचे अध्यक्ष अनुप यादव, सहसचिव मिलिंद बोडखे, रोटरीचे माजी अध्यक्ष मधुसूदन रूंगठा, प्रकल्प निर्देशक नविन चोरडिया व नेहा कोठारी यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना मुख्य अतिथी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी हिंदी ही सर्वश्रेष्ठ भाषा असल्याचे सांगितले. जगातली तिसऱ्या क्रमांकाची ही भाषा असून भारतात देखील हीच भाषा सर्वाधिक बोलली जाते. या भाषेवर प्रभुत्व असलेले विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी प्रधानमंत्री स्व.अटलबिहारी वाजपेयी लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. ही सर्वांग सुंदर भाषा असून हिंदीला लोकमान्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष अतिथी वैशाली मद्दीवार यांनीही हिंदी भाषा आता सातासमुद्रापार गेल्याचे सांगितले. तर ज्येष्ठ पत्रकार संजय तायडे यांनी वर्तमानपत्रात काम करतांना भाषा ही शुध्द हवी हे सांगितले. पत्रकार म्हणून काम करतांना भाषा कशी जपुन वापरावी लागते, शुध्दलेखनात चुक असेल तर कसा गोंधळ होतो, त्यातून कशाप्रकारे मनस्ताप सहन करावा लागतो हे सांगितले. रोटरी क्लबचे अध्यक्ष अनुप यादव यांनी स्वर्गीय देवीदास सोनटक्के व स्वर्गीय उषादेवी खंडारकार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागील आठ वर्षापासून हिंदी दिवस साजरा करीत असल्याची माहिती दिली. हिंदी दिवस कार्यक्रमानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत आठ शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये हिंदी सिटी हायस्कूल, छोटूभाई पटेल हायस्कूल, नूतन विद्यालय, चंद्रपूर पब्लिक स्कूल, रफी अहमद किदवई स्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, प्रियदर्शनी कन्या विद्यालय, घुग्घुस. या सर्व शाळांमधील निबंध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख बक्षिस, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देवून सन्मा‍नित करण्यात आले. हिंदी शिक्षक रवी पांडे यांचा शाल, श्रीफळ व रोख रक्कम देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पाहुण्यांचा परिचय वृषाली डेकाटे, किर्ती चांदे, रवींद्र जुनारकर यांनी करून दिला.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मधुसूदन रूंगठा, प्रदीप बुक्कावार, नविन चोरडीया, जय वाघाडे, नेहा कोठारी यांनी केले. कार्यक्रमाला रोटरीच्या एडीजी रमा गर्ग, माजी अध्यक्ष रवींद्र जैन, प्रदीप बुक्कावार, राम चांदे, महेश उचके, भामरी मॅडम, संदिप रामटेके, जितू जोशी, संजय ढवस, श्रीकांत रेशीमवाले, सचिन गांगरेड्डीवार, मनिष बोराडे, अविनाश रघुसे, निखिल तांबेकर, अनुप पोरेड्डीवार, श्री गण्यारपवार, अजय बलकी, अविनाश उत्तरवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नेहा कोठारी तर आभार प्रदर्शन सहसचिव मिलिंद बोडखे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व मान्यवर मंडळी उपस्थित होती. स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये