ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुप्रसिद्ध समाजसेवक वनराईचे प्रमुख डॉ. गिरीश गांधी यांची वसंतराव नाईक परसबागेला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

भारताच्या मध्यभागी वसलेल्या नागपूर शहरात मनिष नगर येथील श्रीपत राठोड आणि परिवारांनी साकारलेल्या आरोग्यदायी परसबागेचे जैविक पद्धतीने साकारलेले यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी वनराई फाऊंडेशन आणि अनेक समाजोपयोगी संस्था संघटनाचे प्रेरणास्थान,मार्गदर्शक माजी आमदार डॉ. गिरीश गांधी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह थेट सिमेंटच्या जंगलातील भेट चौथ्या मजल्यावर महाराष्ट्राचे प्रदिर्घकाळ मुख्यमंत्री राहून, कृषि,सिंचन,रोजगार,शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक कार्य केलेल्या वसंतराव नाईक यांच्या कार्याचे नित्य स्मरण व्हावे म्हणूनच “वसंतराव नाईक परसबाग,, या नावाने यशस्वीरित्या साकारलेल्या परसबागेला नुकतीच भेट देवून समाधान व्यक्त केले, राठोड परिवाराने करित असलेले सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य समजून घेतले. दुसऱ्यांच दिवसी वनराई फांऊडेशन कार्यालयात संपूर्ण परिवाराचा यथोचित सत्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेक महत्वपूर्ण मान्यवरांची उपस्थिती होती. श्रीपतभाऊ राठोड व जयश्रीताई यांच्या आठव्या व नवव्या वर्गात शिकणाऱ्यां दिपाली राठोड व अंजली राठोड यांचे राष्ट्रीय स्तरापर्यंत सादरीकरण झालेले. “आरोग्यदायी परिवारांसाठी जैविक परसबाग निर्मिती.,, या विषयांवरील सादरीकरण पूर्णपणे समजून घेतले. सर्वांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. विशेष उल्लेखनिय दिपाली राठोड राठोड व अंजली राठोड यांना वाचनांसाठी पुस्तकांचा संच देण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये