ताज्या घडामोडी

राजुरा बस स्थानकाजवळ बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक – स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

राजुरा तालुक्याचा प्रवास गुन्हेगारीकडे होतोय का? - 18 वर्षीय युवकाजवळ पिस्तुल सापडल्याने खळबळ

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

एकेकाळी अत्यंत शांत व कायदा सुव्यवस्था राखणारा तालुका म्हणुन राजुरा तालुक्याची ख्याती होती मात्र मागील काही काळापासून राजुरा तालुक्याचे गुन्हेगारीकरण सुरू झाले की काय? असा प्रश्न तालुक्यात घडणाऱ्या घटनांवरुन उपस्थित केल्या जात आहे.

जवळपास 2 महिन्यांपूर्वी म्हणजेच 23 जुलै रोजी राजुरा येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत पुर्वशा डोहे ह्या तरुण निष्पाप महिलेचा नाहक बळी गेला होता. ह्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आज पुन्हा शहरात एक व्यक्ती बस स्थकानाच्या परिसरात कमरेला पिस्तुल अडकवून फिरत असल्याचे आढळुन आल्याने चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने त्या इसमास अटक केल्याने खळबळ उडाली असुन शहरात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

प्राप्त माहितीनुसार गणेश उत्सवादरम्यान समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांनी अवैधरीत्या शस्त्र व अग्गीशस्त्र बाळगनारे गुन्हेगारा विरुद्ध कारवाही करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम अवैधरीत्या अग्नीशस्त्र त्याचे कमरेला बाळगुन राजुरा बस स्टॉप जवळ फिरत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. ह्या माहितीनुसार त्यांनी पो.उप नि. अतुल कावळे यांचे नेतृत्वात पथक तयार करून, दि. 18/09/2023 रोजी राजुरा बस स्थानकाजवळ सापळा रचून राजरतन राहुल बनकर, वय 18 वर्षे, रा. विहीरगाव ता. राजुरा जि. चंद्रपुर याला ताब्यात घेवुन त्याचे कडुन एक देशी बनावटीचे अग्नीशस्त्र कि 10,000/- रू 1 जिवंत काळतुस कि 1,000/-रू व रियलमि कंपनीचा मोबाईल कि 10,000/- रू. असा असा एकुण 21,000/- रू मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला.

आरोपी राजरतन राहुल बनकर, वय 18 वर्षे, रा. विहीरगाव ता. राजुरा जि. चंद्रपुर विरूध्द पोस्टे राजुरा येथे कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोस्ट राजुरा करित आहेत. सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोनि महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलीस उप निरीक्षक अतुल विनायक कावळे, पोना अनुप डांगे, जमिर पठाण नितेश महात्मे, मिलीद चव्हान, पोशि प्रसाद धुळगडे चानापो दिनेश अराडे सर्व स्थागुशा. चंद्रपुर यानी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये