ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सदस्य मोहिमेला सुरूवात : जागो ग्राहक जागो

ग्राहकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी ग्राहक पंचायत चे सदस्य व्हा : वामन नामपल्लीवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

अखिल भारतीय ग्राहक पंचायत सन १९७४ पासुन संपुर्ण भारत देशात ग्राहक सेवेचे कार्य करत आहे. ग्राहक पंचायत ला ५० वर्ष पुर्ण होत आहे. ग्राहक पंचायत आता सुवर्ण वर्षाकडे वाटचाल करत असुन देशभरात असंख्य ग्राहक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सदस्य होऊन ग्राहकांच्या या चळवळीला गती देण्याचे कार्य करत आहे.

भद्रावती शहरात ग्राहक पंचायत मागील ३४ वर्षापासून काम करत असुन अनेक ग्राहकांच्या समस्या, तक्रारी सोडविल्या एवढेच नाही तर अनेक सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याची जाणीव सर्व भद्रावती करांना आहेच. त्यांच्या याच कामाची दखल घेवुन यावर्षी नगरपालिका भद्रावती ने ग्राहक पंचायत भद्रावती ला ‘भद्रावती भुषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ग्राहकांच्या तक्रारी सोबतच रोजगार मार्गदर्शन शिबीर, नेत्ररोग, कर्करोग आरोग्य शिबीर, हॉलमार्क जनजागृती, सायबर गुन्हा जनजागृती असे अनेक जनजागृती कार्यक्रम घेतले. सोबतच मिठाई, फरसाण दुकानाची तपासणी, पेट्रोल पंप तपासणी, हॉटेलची तपासणी करून ग्राहकांना त्याच्या हक्काचे आणि आरोग्यदायी सुविधा देण्यास कार्य करत असते.

त्यामुळे या वर्षी ची सदस्य नोंदणी ला सुरवात झाली असुन ग्राहक पंचायत चे सदस्य होण्यासाठी संपर्क करून आजच स्वतः ची नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन ग्राहक पंचायत चे अध्यक्ष वामन नामपल्लीवार, प्रविण चिमुरकर, वसंत वऱ्हाटे, अशोक शेंडे, पुरुषोत्तम मत्ते आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये