ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाऊचा दांडिया महोत्सव हा चंद्रपूरकरांचा एक लोकप्रिय सण – आ. धानोरकर

भाऊचा दांडिया महोत्सवाचा थाटात समारोप

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर 24 ऑक्टोबरपर्यंत चाललेल्या “भाऊचा दांडिया” महोत्सवाचा थाटात समारोप झाला. यावेळी, दांडिया स्पर्धेतील विजेत्या संघांना आणि व्यक्तींना बक्षिसे देण्यात आली. सर्वोत्कृष्ट दांडिया संघाला रोख रक्कम, ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सर्व स्पर्धकांनी आपल्या उत्कृष्ट नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या समारोपीय कार्यक्रमात बोलताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले की, भाऊचा दांडिया महोत्सव हा चंद्रपूरकरांचा एक लोकप्रिय सण आहे. या महोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
         यावेळी चॅम्पियन पुरुष गटातून आदित्य अनिल राठोड व महिला गटातून आर्या प्रवीण कोहपरे यांनी पहिला क्रमांक पटकाविला. त्यांना दुचाकी व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कपल गटातून पहिला क्रमांक आनंद इंगोले आणि नेहा डिंगोरे यांनी पटकाविला. त्यांना स्वतंत्र सेनानी स्व. उत्तमचंद राजमलजी पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५० हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडून २१ हजार रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले.  ग्रुप दांडियामध्ये  नगरपरिषद चंद्रपूर निर्वाचित प्रथम अध्यक्ष स्व. राजमलजी पुगलिया यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ राजमलजी पुगलिया फाउंडेशन, चंद्रपूर तर्फे एक लाख चे प्रथम पुरस्कार जय अंबे माँ ग्रुपने पटकाविला. तसेच सोलो पुरुष गटाला संवाद प्रतिष्ठानतर्फे ५० हजार देण्यात आले. हा पुरस्कार ध्रुव डोंगडे यांनी पटकाविला तर सोलो महिला गटातून  ५० हजार रुपयांचा पुरस्कार तेजस्विनी पत्रकार हिने पटकाविला. या गटातील विजेत्यांना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडून प्रत्येकी २१ हजार रुपये रोख देण्यात आले.  काँग्रेस चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडून लहान ग्रुपचा दक्ष बर्वे, सुहास बहुरिया, सौम्य चालूलकर, मुलींचा गटातून आरोही मुन, सारा शेख यांनी पटकाविला.  काँग्रेस नेते महेश मेंढे यांच्याकडून ३५ वयावरील (महिला) ११ हजार रुपये बक्षीस स्नेहा अमोल धकाते हिने पटकाविला. अन्य गटातील स्पर्धकांना देखील बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीने केले होते. या समारोपीय कार्यक्रमाला आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, भद्रावती नगर परिषद अध्यक्ष अनिल धानोरकर, शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षा नम्रता ठेमस्कर, शहर काँग्रेस अध्यक्षा चंदाताई वैरागडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा,  इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, काँग्रेस नेते महेश मेंढे, काँग्रेस महिला नेत्या अश्विनी खोब्रागडे, काँग्रेस जेष्ठ नेते गजानन गावंडे, संवाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदूभाऊ वासाडे, प्रा. विजय बदखल, माजी नगरसेवक अशोक नागापुरे, माजी नगरसेवक देवेंद्र बेले, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार, सुधीर ठाकरे  तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
१७ ऑक्टोबरपासून या उत्सवाला सुरुवात झाली. २४ ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव सुरू होता. दरम्यान, २१ ऑक्टोबर रोजी नच बलिये तसेच रोडीज एक्स २, बिगबॉस ९ चा विजेचा प्रिन्स नरुला याने हजेरी लावली. यावेळी त्याला पाहण्यासाठी चंद्रपूरकर युवक, युवतींनी मैदानावर मोदी गर्दी केली. त्याची एक झलक कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मैदानावरील युवतींमध्ये चुरस बघायला मिळाली. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते प्रिन्स नरुला याचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी चंद्रपूरकरांशी संवाद साधत त्यांची मने जिंकली. २२ ऑक्टोबर रोजी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत प्रथमेश परब यांची उपस्थिती होती.
या महोत्सवामुळे चंद्रपूरकरांना एकत्र येण्याची आणि दांडिया खेळण्याची संधी मिळाली. भाऊचा दांडिया महोत्सव हा एक उत्तम कार्यक्रम आहे. या महोत्सवामुळे चंद्रपूरकरांना एकत्र येण्याची संधी मिळते. या महोत्सवाचे आयोजन करणाऱ्यांचे मी आभार मानतो.”अशा भावना स्पर्धकांनी व्यक्त केल्या.

 
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये