ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वन जमिनीवर अतिक्रमण करणे पडले महागात

ग्रामपंचायतचे उपसरपंच व दोन सदस्य अपात्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

   सावली तालुक्यातील सामदा बूज ग्रामपंचायत तीन सदस्यांवर अपात्र कार्यवाही करण्यात आली.

 सविस्तर वृत्त असे कि ग्रामपंचायत सामदा बूज येथील ग्रा.प. सदस्य रुमाजी कोहळे व मनोज खेवले व उपसरपंच नितेश मनोहर जुवारे हे सन २०२१ च्या ग्रामपंच्यात निवडणुकीत ग्रा.प.सदस्य पदावर कार्यरत होते.

      उपसरपंच नितेश जुवारे यांंनी जागा हडप करून स्वतःच्या नावे इंपंजीला नोंद करून अतिक्रमण करून धान पिक घेत असून रुमाजी कोहळे व मनोज खेवले यांनी सुद्धा वन विभागाच्या व गावठाण मधील सरकार जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी व त्यामध्ये बांधण्यात आलेली शासकीय विहीर हि अतिक्रमण जागेवर असू शकते असे सभ्रम असल्याचे लक्षात आल्याने ह्या बाबत वन विभागानी चौकशी करुन सदर अहवाल व इतर कागदपत्राच्या आधारे जिल्हाधिकारी १९५८ चे कलम १४ (१) व ( ज -३ ) नुसार दोषी आढळून आल्याने उपसरपंच व दोन्ही सदस्यांवर अपात्रेची कार्यवाही २८/०३/२०२४ रोजी करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये