आदर्श माता शेवराई ज्ञानदेव भोसले यांचा सत्कार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
नायगावमध्ये एका छोट्याश्या गावात राहणारे आदिवासी कुंटुब पारधी समाजातील एक आदर्श माता शेवराई ज्ञानदेव भोसले यांचा सत्कार मा.न्यायमूर्ती लेखक नामदेवजी चव्हाण व त्यांच्या पत्नी यांनी घरी येऊन नायगावमध्ये शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी लेखिका जयश्रीताई रामुळे, यवतमाळ समाजसेवक नामदेव भोसले, तुकाराम ज्ञानदेव भोसले,सुजाता ज्ञानदेव भोसले, सुरेखाताई तुकराम भोसले, पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले, ग्रीष्म तुकराम भोसले, अनिल ज्ञानदेव भोसले,अलकाताई तानाजी गायकवाड,लेखक नामदेव भोसले यांचे काम महाराष्ट्रभर आहे.
महाराष्ट्राने आदर्श माता शेवराई ज्ञानदेव भोसले यांचा आदर्श घ्यावा. माझ नशिब आहे माझ्या हाताने या मातेचा सन्मान करण्याचा योग आला कै.ज्ञानदेव भोसले यांनी मुलांना घडवले आणि दुस-यांना नेहमी मदत करायचे स्वतः भिक मागुन लोकांना दान करायचे गरजु लोकांना, हे त्यांचे काम प्रमाणिक होते असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.