ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोफत व विना खर्च पिक विमा योजनेचा लाभ तालुक्यातील हजारो शेतकरी बांधवांनी घेतला

सभापती समाधान शिंगणे यांनी राबवला शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम -

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा अशोक डोईफोडे

कृषि उत्पन्न बाजार समिती देऊळगांव राजाचे कार्यरत संचालक मंडळाने माजी मंत्री तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या व्यापक कल्पनेनुसार व मार्गदर्शनाखाली देऊळगांव राजा तालुक्यातील शेतकरी बांधवांना पिक विमा भरता यावा म्हणून मोफत पिक बिमा योजना राबविण्यांचा निर्णय घेतलेला आहे.

त्यानुसार देऊळगांव राजा येथे 1 व देऊळगांव मही येथे 1 असे 2 केंद्र सुरु करण्यांत आले होते. या केंद्रावर शेतकरी बांधवाना मोफत पिक विमा तसेच विना खर्च पिक विमा भरून देण्यांचे काम समितीचे कर्मचा-यांनी केले आहे. बाजार समितीचे कार्यालयांत देऊळगांव राजा येथील पिक विमा केंद्रावर देऊळगांव मही येथील छत्रपती ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेमध्ये शेतकरी बांधवांनी पिक विमा केंद्रावर हजारो शेतक-यांनी उपस्थीत राहुन लाभ घेतला आहे. सदर योजनेचा लाभ बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील हजारो शेतक-यांनी घेतला असुन, समितीने राबविलेल्या योजनेचे शेतकरी बांधवांनी कौतुक केले असुन बाजार समितीचे शेतकरी हिताचे निर्णया बददल धन्यवाद दिले. तसेच शेतकरी बांधवानी आमदार डॉ.राजेंद शिंगणे यांचे आभार मानले.

बाजार समितीने पुढील वर्षीसुध्दा मोफत व विना खर्चा ची योजना सुरु ठेवण्यांचा संकल्प केला असुन यापुढेसुध्दा समितीचे संचालक मंडळ आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सुचनेनुसार व त्यांचे नेतृत्वात सदरची योजना राबविणार असल्याचे समितीचे सभापती समाधान शिंगणे व संपुर्ण संचालक मंडळाने ठरविले आहे. पिक विमा केंद्रावर शेतकरी बांधवांना विना खर्च पिक विमा भरता यावा म्हणुन बाजार समितीचे सचिव किशोर म्हस्के व त्यांचे कर्मचारी यांनी तसेच छत्रपती ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेचे मॅनेजर, नितीन मुजमूले व त्यांच्या स्टाफने सहकार्य केले व शेतक-यांना त्रास होऊ दिला नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये