ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऐतिहासिक बौध्द स्थळांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहीजे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर :- चंद्रपुर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरातन ऐतिहासिक बौध्द संस्कृतीचे अवशेष विखुरलेले आहेत. जसे भद्रावती येथे ऐतिहासिक बुध्द लेणी आहे. त्याच प्रमाणे माणिकगढ – गडचांदूर येथील परिसरातही मोठ्या प्रमाणात बौध्द संस्कृतीचा ठेवा आहे. या ऐतिहासिक बौध्द स्थळांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहीजे. ऐतिहासिक विज्जासन बुध्द लेणी येथिल बुध्द मुर्ती फोडणारा आरोपी पकडण्यात पोलीसांना अपयश आलेले आहे. जो प्रकार ऐतिहासिक विज्जासन बुध्द लेणी येथे झाला. तसा समाज विघातक प्रकार इतर ऐतिहासिक बौध्द स्थळांवर होवु नये याची गंभिर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली पाहीजे. तसेच बौध्द उपासक, उपासिका व अनुयायांनी याबाबत सजग व जागरुक राहणे गरजेचे आहे.

या कार्याकरीता बुध्द लेणी सिक्युरिटी अँक्शन कमिटी, जिल्हा चंद्रपुर (महाराष्ट्र) निर्माण करण्यात आलेली आहे. ही कमिटी जिल्ह्यातील भिक्खु संघाच्या मार्गदर्शनात कार्य करणार आहे असे ऐतिहासिक बुध्द भुमी गडचांदुर येथे पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. ही बैठक वंदनिय भिक्खु कश्यप यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीचे जिल्हा संयोजक राहुल उमरे यांनी आयोजित केलेली होती.

या बैठकीत जिल्हा संयोजक हरिशभाई दुर्योधन, नाना देवगडे, सिध्दार्थ सुमन, उमेश रामटेके, शेलेश शेंडे, मुन्ना आवळे, संतोषभाई रामटेके यांनी आपले विचार व्यक्त केले.

बैठकीत नितेश रंगारी, घनश्याम पिपरे, अरून शिंदेकर, देवानंद मुन, पंडित डोंगरे, कोमल वाटोरे, गजानन ताकसांडे, श्याम वाघमारे, महेश ससाने, गौतम भसारकर ईतर भीम सैनिक इत्यादींनी चर्चेत भाग घेतला.

त्यानंतर उपस्थितांनी सविस्तर चर्चा करुन बुध्द लेणी सिक्युरिटी अँक्शन कमिटी जिल्हा चंपुर (महाराष्ट्र) मधे सहभागी होण्याचा एकमताने निर्णय घेतला. सदर बैठकीत कोरपना तालुका संयोजन समितीचे गठण करण्यात आले. बैठकीचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन राहुल उमरे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये