ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नेत्र तपासणी शिबिर 2024 चे आयोजन

रिक्षाचालक व स्कूलबस चालक यांची नेत्र तपासणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत आज दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा व जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र तपासणी शिबिर 2024 चे आयोजन करण्यात आले आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तसेच उपस्थित सर्व रिक्षाचालक व स्कूलबस चालक यांची नेत्र तपासणी करण्यात आली व संबंधित चालकांस प्रशस्ती प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉक्टर मनोज सत्यपाल जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय,तसेच श्री किशोर मेश्राम नेत्र चिकित्सा अधिकारी सामान्य रुग्णालय वर्धा व राजेश शिंदे अध्यक्ष स्कूल वाहतूक संघटना यांचे योगदान लाभले सदर कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे मोवानि साधना कवळे, समोवानि हेमंत गावंडे,अमर पखान,राहुल ढोबळे व चालक टीकस उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये