ताज्या घडामोडी

पो.स्टे. रामनगर हद्दीत उपविभागीय पोलीस पथक वर्धा यांनी विदेशी दारू व दुचाकी वाहन केले जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन रामनगर येथे दिनांक 09.05.2024 रोजी दुपारी 12.00 वाजता पासुन पो. स्टे. परीसरात पेट्रोलींग करीत असता त्या दरम्यान मुखीबीर कडुन माहीती मिळाली की विक्की बालवे रा. गौरक्षण वार्ड, वर्धा हा विदेशी दारूची चिल्लर विक्री करीत असुन तो त्यांचा विदेशी दारूचा माल जय कैथवास रा. गौरक्षण वार्ड, वर्धा याचे घरी लपवुन ठेवत असते अशा मुखबीर कडुन मिळालेल्या खबरेवर प्रो. रेड करणेकरीता दोन पंचाना घेवुन गौरक्षण वार्ड, वर्धा येथे जय प्रदीप कैथवास वय 28 वर्ष रा. गौरक्षण वार्ड, वर्धा याचे घरझडती घेतली असता.,

त्यांचे घरझडतीतुन 1) एक जुनी वापरती दुचाकी होन्डा कंपनीची अॅक्टीवा 3 जी गाडी क्र. एम.एच/32/ए.सि./0369 पांढऱ्या रंगाची किंमत अंदाजे 50,000/- रू त्याचे डिक्की मध्ये कापडी पिशवीत 2) 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस ब्लु कंपनिच्या 12 शिश्या 3) 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या रॉयल स्ट्रॅग (आर.एस) 12 शिश्या तसेच आरोपीचे घरझडती मध्ये 4) 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या आयकॉनिक व्हॉईट कंपनीच्या अर्ध्या खर्रडयाचे खोक्यामध्ये 24 शिश्या 5) 500 एम.एल. च्या हार्यवर्ड -5000 कंपनीची अर्ध्या खर्रडयाचे खोक्यामध्ये बियर दारूने भरून असलेल्या एकुण 24 टिन कॅन असा एकुण जु. किंमत 74,000/- रू. चा माल अवैध्य रित्या मिळुन आल्याने ते जागीच जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त केला.

सदर विदेशी दारू माला बाबत विचारपुस केली असता सदर विदेशी दारू चा माल हा विक्की बालवे रा. गौरक्षण वार्ड, वर्धा याचा असुन तो वेळो वेळी येवुन येथुन विदेशी दारूच्या शिश्या घेवुन जात असतो असे सांगीतले वरून दोन्ही आरोपीतांचे विरोधात पो.स्टे. रामनगर येथे अपराध क्र 346/24 कलम 65 ई 77 अ 83 म.दा.का अन्वये गुन्हा नोद करण्यात आला आहे पुढील तपास पो. स्टे. रामनगर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री नुरुल हसन सा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद के. मकेश्वर सा. याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलय वर्धा येथील पो.हवा. अमर लाखे पो.शि, पवन निलेकर, मंगेश चावरे, समीर शेख यांनी यशस्वी रित्या कार्यवाही केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये