ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तालुक्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपले

श्रीराम नगर येथील वट वृक्ष कोसळला तर चोरा येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्याला पुन्हा एकदा दि. ९ रोज गुरुवारला दुपारी एक वाजता अवकाळी वादळी पावसाने झोडपले. या वादळी पावसात वीज कोसळून शहरातील श्रीरामनगर येथील माजी नगर सेवक चंद्रकांत खारकर यांच्या घरासमोरील १८ वर्षे जुने वडाचे झाड मंदिर तथा घरांच्या वाल कंपाऊंडवर कोसळल्याने मंदिराचे व दोन घरांच्या वॉल कंपाऊंडचे मोठे नुकसान झाले.

तर तालुक्यातील चोरा गाव शिवारात वीज पडून अरुण दशरथ चिकटे व सुनील नामदेव आसुटकर यांच्या प्रत्येकी एका बैलांचा मृत्यू झाला. आज दुपारी एक वाजता पासून तालुक्यात विजेच्या कडकडेसह वादळी पावसाला सुरुवात झाली. या वादळी पावसाने तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे प्रभावित झाले असून तालुक्यातील भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दोन दिवसांपूर्वीही तालुक्यात अवकाळी वादळी पावसाने थैमान घातले होते. या वादळात तालुक्यातील माजरी गावातील घरांची मोठी पडझड झाली होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये