गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एकाच रात्री रेतीने भरलेली तीन ट्रॅक्टर जप्त

बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

विसापूर येथील वर्धा नदी घाटावर दि. १० मेच्या रात्री एक वाजताच्या दरम्यान बल्लारपूर पोलीसचे चमू रात्रौ गस्त करताना विसापूर गावाततुन बाहेर येत असताना काही ट्रॅक्टरचा आवाज नदीचा दिशेने येत असताना पोलीस टीम नदीचा दिशेने गेली असता नदी घाटावरून रेतीने भरलेली ट्रॅक्टर दिसून आली. पोलीस चमू रात्रीचा काळोख मध्ये लपून बसून रेतीने भरलेली ट्रॅक्टर जवळ येताच पकडण्यात आले. तिथे ट्रॅक्टर चालकने अंधाराचा फायदा घेत पोलीस चमूशी हुज्जत घालू लागला तेव्हा PSI चाटे यांनी पोलीस स्टेशनला फोन कळवून पोलीस दल बोलावण्यात आले असता त्या रोडने येणाऱ्या रेतीने भरलेले ट्रॅक्टर एक एक करून तीन ट्रॅक्टर पकडण्यात आले. ही कारवाई रात्रौ १२ वाजता पासून तर सकाळ पर्यंत करण्यात आली.

सकाळला पोलीस स्टेशनला आणून ट्रॅक्टर चालक व मालक वर कलम ३७९,३४,४८, कलम 3गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर चालक १)बंडू जनार्धन कोवे(४४),२)राजू देवराव टेकाम (३५),३)रवी गट्टय्या आळे (३४),४)सागर चांदुजी कोडापे(२८)सर्व राहणार विसापूर आणि ट्रॅक्टर मालक बीजेपी बल्लारपूर तालुका अध्यक्ष किशोर पंदिलवार यांचा भाऊ संजय पंदिलवार, विसापूर चे सरपंच कुळमेथे यांचे पती मच्छिन्द्र कुळमेथे आणि बंडू नांदे यांच्यावर ही कलम ३७९,३४,४८,खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक मालमत्ता, कलम ३,नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचा आदेशानुसार बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार असिफ राजा शेख रात्रौ स्वतः कारवाईत हजर राहून PSI गोविंद चाटे, ASI गजानन डोईफोडे, API पांडे, प्रकाश वामन शेंडे, PSI लोखंडे, आदी नि केली,चार आरोपी चालक यांना अटक करण्यात आली. ट्रॅक्टर मालक फरार झाले आहेत.महसूल विभाग चे मंडळ अधिकारी व पटवारी यांनी बल्लारपूर तालुक्यातील नदी नालेवर अवैध रेती तस्करी काही प्रमाणात रोखली.तरीही रेती तस्कर जुमाणत नसल्याने आता ठाणेदार यांची खबर घेत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये