चंद्रपूर येथे संत सेनाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
चंद्रपूर येथे संत सेनानी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाभिक महामंडळ चे अध्यक्ष रमेशराव हनुमंते होते,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून हरीश ससनकर (शिवरक्षक जिवाजी महाला पुस्तकाचे लेखक) होते, प्रमुख अतिथी म्हणून ऍड.विनोद बोरसे, श्रीकांत सहारे,अध्यक्ष सर्व सेवा शिक्षण मंडळ, प्रकाश चांदेकर, सरोजताई चांदेकर, कीर्तन व प्रबोधनकार, शामदेवजी उरकुडे, दत्तूभाऊ कडुकर, वैष्णवी विश्वंभर मांडवकर,तसेच आयोजक मधुकर क्षीरसागर हे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी,कीर्तन,प्रबोधन,गुणवंत विद्यार्थी व खेळाडू सत्कार,विशेष कार्य सत्कार,काला व महाप्रसाद
आदी कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन नाभिक महामंडळाचे पदाधिकारी सर्वश्री मधुकरभाऊ क्षीरसागर, अरुणराव चौधरी, राजेंद्र बन्सोड, भाऊराव येसेकर व अन्य पदाधिकारी यांनी केले.याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.