ताज्या घडामोडी

तुमच्या तोंडात साखर पडो – विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार ह्यांची खा. हेमंत पाटलांना उत्स्फूर्त दाद

बारामती येथील व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर परिषदेचे थाटात उद्घाटन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महाराष्ट्रातील विकासाचे मॉडेल असलेल्या बारामती येथे आयोजित राज्य शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी तुमच्या तोंडात साखर पडो अशी उत्स्फूर्त दाद विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार #vijay_wadettiwar ह्यांनी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील hemant_patil ह्यांच्या पत्रकारांशी सुरू असलेल्या संवादादरम्यान ग. दि. माडगूळकर सभागृहात सुरू असलेल्या उद्घाटनिय सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांच्या गृहस्वामिनी सुनेत्रा पवार ह्यांच्या उपस्थितीत दिली.

देशातील पत्रकारांची सर्वात मोठी संघटना व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे नोंद असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया चे राज्य शिखर अधिवेशन बारामती येथिल विद्या प्रतिष्ठानच्या ग. दि. मा. सभागृहात सुरू आहे. अधिवेशनाच्या उद्घटनिय कार्यक्रमात हिंगोलीचे खा. हेमंत पाटील ह्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार ह्यांचा उल्लेख विरोधीपक्षनेते हे भावी मुख्यमंत्री असा करताच विजय वडेट्टीवार ह्यांनी तुमच्या तोंडात साखर पडो अशी उत्स्फूर्त दाद दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये