ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात ‘वाणिज्य अभ्यास मंडळाची स्थापना’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे वाणिज्य विभागाच्या वतीने ‘वाणिज्य अभ्यास मंडळाची स्थापना’ दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. व्हि. एम. बडवाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. व्हि. बी. पवार, प्रा. डॉ. पी. एस. वैराळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. व्हि. एम. बडवाईक यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातुन ‘वाणिज्य अभ्यास मंडळाची स्थापना’ करण्याचा उद्देश आणि त्याचे महत्व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

प्रा. डॉ. व्हि. बी. पवार यांनी वाणिज्य अभ्यास मंडळाच्या कार्यकारणीची घोषणा केली. वाणिज्य अभ्यास मंडळाचा अध्यक्ष म्हणून बि. कॉम. अंतिम वर्षाचा विद्यार्थी अमित देवनाथ गंडाटे, उपाध्यक्ष कुंदन लहानुजी कोटरंगे बि. कॉम. द्वितीय तसेच बि. कॉम. अंतिम वर्षाची विद्यार्थीनी कु. राधा सुखदेव पोटे हिची सचिव म्हणून निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. पी. एस. वैराळे यांनी केले. संचालन बी. काॅम. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी हर्षला आभारे हिने केले तर उपस्थित सर्वांचे आभार बी. काॅम. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी लखन चौधरी ह्यानी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये