ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही येथील शिक्षक युवराज बोरकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेवाही : फुले सामाजिक व सांस्कृतिक शिक्षण मंडळाद्वारे संचालित महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही येथील शिक्षक युवराज बोरकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र ढोले, संचालिका डॉ. सरीता ढोले यांनी बोरकर यांना बोरकर यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वर्षा विनायक घुगुसकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून विलास टेंभुर्णे, दिनकर उईके, रवींद्र बोकडे उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने बोरकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बोरकर यांचे महात्मा फुले विद्यालयाच्या प्रगतीत मोलाचे योगदान आहे.

विद्यालयासाठी आयुष्यभर प्रयत्न केले, असे मनोगत मुख्याध्यापिका वर्षा घुगुसकर यांनी व्यक्त केले. संचालन आर. टी. बोरकर यांनी, तर आभार एच. आर. साहरे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये