ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खवातीन ए इस्लाम कडून 21 जोडप्याचा विवाह संपन्न

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 खवातीन ए इस्लाम या मुस्लिम महिला संघटने कडून नुकताच चंद्रपूर येथे कोहिनूर ग्राउंड दादमहल येथे मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला, यात 21 जोडप्याचा विवाह संपन्न यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार,आमदार किशोर जोर्गेवार,वणी चे माजी आमदार वामनराव कासावार, सह अन्य 25 हजर पेक्षा जास्त जनसमुदाय या विवाह सोहळ्यात उपस्थित होता.

यात प्रत्येक जोडप्याला जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या यात पलंग, बिस्तर,आल्मारी,कुलर,टेबल खुर्ची,ट्रॉली बॅग, ड्रेसिंग टेबल, व इतर जीवनावश्यक वस्तू अंदाजे किंमत साठ,ते सत्तर हजार पर्यंत च्या वस्तू देण्यात आल्या., या मेळाव्याचे हे सहावे वर्ष असून या वर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. समाजाच्या सर्व स्तरावरून याची प्रशंसा केली जात आहे. सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.समाजाने असाच प्रतिसाद दिल्यास दर वर्षी हा सोहळा घेतला जाईल असे उदगार या संघटनेच्या अध्यक्ष शाहीन शेख यांनी काढले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये