Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे लिंक फेल मुळे नागरिकांना त्रास 

विदर्भ कोकण ग्रामीण बँक मध्ये पैसे नसल्याने लिंक फील चे कारण सांगून खातेदाराची होत आहे फसवणूक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे व मुख्य बाजार असल्यामुळे खेड्यापाड्यातील शेतकरी वर्ग शेतीसाठी लागणारे खत औषधी व वनमजुरी यांचे पैसे देण्यासाठी बँकेत असलेले पैसे काढण्यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँक येथे येतात तसेच नुकत्याच सरकारने लाडकी बहिणीचे पैसे काढण्यासाठी महिला येतात मात्र मागील काही दिवसापासून तांत्रिक अडचणीमुळे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील व्यवहार ठप्प झाले आहेत.

त्यामुळे खातेदारांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे पैशासाठी नागरिक दिवसभर बँकेत बसत आहेत तरीही पैसे मिळत नसल्याने खातेदार त्रस्त झाले असून या बँकेत दररोज हजारो खातेदार बँकेतून व्यवहार करतात त्यामध्ये लाखो रुपयाची उलाढाल होते परंतु व्यवहार होत नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे खात्यात पैसे असल्यावर सुद्धा पैसे निघत नसल्याने खातेदारांमध्ये बँक प्रशासनाचा विरोधात मोठ्या प्रमाणात रोस पाहायला मिळत आहे चांदा ब्लास्ट कोरपणा प्रतिनिधी ला माहित होतात विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे मॅनेजर यांना लिंक बद्दल विचारण्यात आली असता मॅनेजर यांनी तिकडूनच लिंक फेल असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असे प्रत्युत्तर आम्हाला दिले.

मात्र सूत्राकडून माहिती अशी मिळाली की विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये पैसे नसल्यामुळे लिंग च नाव सांगून खातेदाराची फसवणूक करीत आहे खातेदार त्यामुळे त्या ठिकाणी असलेले खातेदार यांनी जर आम्हाला पैसे न मिळाल्यास बँकेचे पासबुक रद्द करून दुसऱ्या बँकेचे व्यवहार करू असे यावेळी खातेदार यांनी आमच्याशी संवाद साधला तर काही खातेदार यांनी लवकरात लवकर आर्थिक व्यवहार सुरळीत करण्याची मागणी सुद्धा नागरिकाकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये