ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरगुती सिलेंडरचा हॉटेल व्यावसायिकांकडून सर्रास वापर!

कारवाई करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

       मागिल काही वर्षांपासून गॅस सिलेंडर चे दर हे सातत्याने वाढत आहेत,त्यातच घरगुती सिलेंडर हा व्यावसायिक सिलेंडर पेक्षा कमी किमतीचा असतो,परंतु या सरकारच्या काळात प्रत्येक ग्राहकाला वर्षातून घरगुती कनेक्शन धारकांना कितीही सिलेंडर वापरण्याची मुभा असल्या कारणाने त्याचा गैरवापर हा मागील काही वर्षापासून गडचांदुर तथा आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल,बार व्यावसायिकांकडून होत आहे.

       सामान्य घरगुती कनेक्शन धारक यांना २ किंवा ३ महिन्यातून एक सिलेंडर लागतो त्यात त्यांच्या कार्ड वर हॉटेल,वाइन बार व्यावसायिक हे कितीही घरगुती सिलेंडर घेऊन त्याचा उपयोग व्यवसायात सर्रास पणे करतांना आढळून येते,परंतु अन्न व औषध प्रशासन विभागाचे याकडे काबरे दुर्लक्ष होत आहे याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे,यात सरकारचा व्यवसायिक सिलेंडर कनेक्शन धारकांकडून फसवणुक होत असून सरकारचा महसूल चुकवण्याचे धाडस हे हॉटेल व्यवसायिक करतं असताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे याकडे दुर्लक्ष यामध्ये काही अर्थपूर्ण व्यवहार होत आहे का? हा जनतेपुढे प्रश्न उपस्थित होत आहे.

    तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या व्यावसायिकांवर कारवाई करावी,अन्यथा संबंधित विभागाच्या चंद्रपूर जिल्हा कार्यालय समोर बसून आंदोलन करण्याचा इशारा शहरवासीयांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये