ताज्या घडामोडी

75 व्या स्वातंत्र्याचा वर्धापन दिनानिमित्त अमृत महोत्सव वर्धा कारागृह वर्ग 1 येथे साजरा

चांदा ब्लास्ट : अविनाश नागदेवे प्रतिनिधी वर्धा….‌

15 अगस्त 2023 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत यानिमित्ताने संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य मिळालाचा आनंद महोत्सव साजरा करतात येथे यानिमित्ताने वर्धा जिल्हा कारागृह वर्ग 1 येथे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रम घेण्यात आला आहे यावेळी कारागृह अधीक्षक श्री सुहास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री नितीन क्षिरसागर कनिष्ठ तुरुगांधिकारी श्री सुहास नागमोते तुंरुगाधिकारी जितेंद्र भावसार यांच्या हस्ते झेंडयाला मानवंदना देऊन झेंडयाला सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणून यानंतर 474 बंदी बांधवांनी सुध्दा कारागृहाच्या आत झेंडावंदन केलेलं आहे

यानंतर नास्ता म्हणून बुंदीचे लाडू आणि समोसे अधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे यानंतर तीन बंदी बांधव यांना शिक्षेमधून मुक्त करण्यात आले आहे या कैद्यामध्ये बी- १९५ रायभान अंकुष भगत | बी-१०४ त्रिशुळ शामराव कामरकर बी-२५ कृष्णराव संपतराव रहाटे यांना शिक्षेमधून मुक्त करण्यात आले आहे सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कारागृहातील कर्मचारी


श्री रामराव गायकवाड सुभेदार श्री आशुतोष बोंडे श्री शरद सरसरे श्री सोळंके श्री वरखडे श्री वाघमारे श्री कोठारकर श्री प्रमोद पहाडे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये