ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात क्रीडा दिनाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा.शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली अंतर्गत शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने दिनांक २९ ऑगस्ट २०२३ ला दुपारी १२.३० वाजता महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री अनिल स्वामी उपस्थितीत होते. हा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश पाडणे, विद्यार्थ्याना खेळाविषयी आवड निर्माण करणे, तसेच विविध खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्याचा सत्कार करणे हा होता. मागील सत्रातील विविध खेळामध्ये सहभागी व प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या खेडाळूंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

ह्या कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी आलेले वाणिज्य विभाग प्रमुख विनोद बडवाईक यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकले तसेच दुसरे प्रमुख मार्गदर्शक क्रीडा विभागाचे सदस्य प्रा. देवीलाल वताखेरे यांनी विद्यार्थ्याच्या जीवनात खेळाचे काय महत्त्व आहे हे नमूद केले. विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना अनिल स्वामी यांनी सांस्कृतिक विभागाप्रमाणे विद्यार्थ्यांनी क्रीडा विभागाकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे आहे नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालये कार्यकारी प्राचार्य प्रा. डॉ. अशोक खोब्रागडे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना सांगितले खेळामधून विद्यार्थी आपल्या आरोग्याची कशी काळजी घेवू शकता त्याचप्रमाणे खेळाच्या माध्यमातून आपले करिअर मध्ये कसे प्रगती करू शकता असे नमूद केले.

ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुकारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विजयसिंग पवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये