ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अरबिंदो रियालिटी कोळसा कंपनीद्वारे ग्रामस्थांना लोहांच्या गोळ्यांचे (आयरन गोळ्यांचे) वाटप

डोंगरगाव खडी येथे कार्यक्रम ; जेना - टाकळी येथील ग्रामस्थांना होणार गोळ्यांचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          लोहाच्या गोळ्यांच्या मदतीने शरीराला लोहाचा पुरवठा होतो. व शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. शरीरासाठी लोहाच्या गोळ्यांचे (आयरन पिल्स )महत्त्व जाणून अरबिंदो रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड जेना,बेलोरा नॉर्थ,साऊथ कोल माईन्स प्रोजेक्ट तर्फे लोहाच्या गोळ्यांचे वितरण दिनांक एक सप्टेंबरला प्राथमिक स्वास्थ्य केंद्र डोंगरगाव खडी येथे करण्यात आले. याविषयीची मागणी या तीनही गावातील ग्रामस्थांनी कंपनीकडे केली होती. कंपनीच्या सीसीआर फंडातून लोहाच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यानंतर या गोळ्यांचे वाटप प्राथमिक स्वास्थ्य केंद्र डोंगरगाव येथून ग्रामस्थांना होणार आहे.

या गोळ्यांचा वाटप बेलोरा, जेना, पान वडाळा येथील ग्रामस्थांसाठी या खदानी च्या माध्यमातून सीसीआर फंडातून करण्यात आला आहे तसेच या प्रकल्पाद्वारे वैद्यकीय दृष्ट्या नियमितपणे त्या ठिकाणच्या नागरिकांना वैद्यकीय दृष्ट्या मदत केली जाते. या कार्यक्रमाला डोंगरगाव खडी चे सरपंच मनीषा तुराणकर, पंचायत समिती सदस्य जगदीश चौधरी, डोंगरगाव प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर सुनील काटकर, अरविंदो कंपनीचे अधिकारी लक्ष्मण राव. सय्यद तहसीनुल हक, विनोद मत्ते,राजू डोंगे, जावेद शेख,कुशल नरांजे व सी. सी. आर. फंड ऑफिसर सचिन दुबे उपस्थित होते.

अरविंद कंपनीद्वारे या परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीच्या दृष्टिकोनातून कंपनीने नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे. असाच सकारात्मक विचार आम्ही भविष्यातही करू असा विश्वास अरबिंदो कंपनीचे अधिकारी लक्ष्मण रावयांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये