ताज्या घडामोडी

ट्रक व बस आमणे -सामने धडक

दोन्ही चालक जखमी सह ११ प्रवाशी जखमी

चांदा ब्लास्ट :सुधाकर श्रीरामे

नागभीड नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या एम आय डी सी परिसरात आज सकाळी आठ वाजता ट्रक व बस समोरासमोर धडक दिल्याने दोन चालकसह ११प्रवाशी जखमी झाले आहे.
ब्रम्हपुरी आगाराची विठाई बस क्रमांक एम एच १३सि यु ८८३७ही ब्रम्हपुरी वरून अमरावती येथे जात होती तर नागपूर वरून मालवाहू गॅरेजचा ट्रक वडसा येथे जात असताना एम आय डी सी परिसरात धडक झाल्याने दोन्ही वाहनाचे नुकसान झाले असून ट्रक चालकाचे दोन्ही पाय निकामी झाल्याचे कळते तर बस चालक जखमी झाले आहे वाहक रीना मेश्राम चालक उंबरकार, मारोती कपागते मुकेश निकोसे उमरेड, श्नेहा वराटे, विलास विधाते, संजय मोहडे, मनीषा मोहडे, श्लोक मोहडे महेंद्र करंबे, मंथन करंबे, अर्धाउंश करंबे, तुकाराम चावडे यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले ट्रक चालक पंकज गंभीर जखमी असल्याने नागपूर येथे हलविण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार घारे यांचे मार्गदर्शनाखाली पी एस आय साखरे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये