Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री मार्कंडेय गुरुकुल बालसंस्कार शाळा भव्य शुभारंभ

चांदा ब्लास्ट

पद्मशाली समाज चंद्रपूर व अखिल विश्व गायत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 27 ऑगस्ट 2023 ला सायंकाळी 4 वाजता श्री महामृत्युंजय मार्कंडेय देवस्थान पद्मशाली समाज भवन, महाकाली मंदिर जवळ,चंद्रपूर येथे श्री मार्कंडेय गुरुकुल बाल संस्कार शाळेचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मशाली समाज चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखरजी अल्लेवार यांच्या हस्ते पार पडले.

उद्घाटन प्रसंगी पद्मशाली महिला मंडळच्या अध्यक्ष लताताई तुम्मे, पद्मशाली युवा मंच अध्यक्ष गितेश मुसनवार व गायत्री परिवार चंद्रपूर तर्फे बाल संस्कार शाळा आचार्य सेवा देण्याकरता चित्रकार श्री महेश कानपिल्लेवार, संजय मिश्रा, निसर्गोपचार व ॲक्युप्रेशर तज्ञ डॉ. राहुल भेंडे, नृत्य निर्देशक  प्रशांत कत्तुरवार, बाल मनोचिकित्सक भारती मिश्रा, वर्षा बैस, नृत्य निर्देशिका पूनम झा, शितल वासलवार, सौ सुनंदा पोतनवार, डॉ. भावना भेंडे यांचीउपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये