ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली शहरात मोकाट जनावर व भटके कुत्र्यांचा सुळसुळाट

नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सावली शहरात मागील काही वर्षापासून मोकाट जनावरांमुळे दुचाकी,चारचाकी चालक त्रस्त झाले आहेत.अनेक ठिकाणी अपघाताचा मोठा धोका असतानाही नगर पंचायत प्रशासन झोपी गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करा,अशी मागणी जोर धरत आहे.

शहरात सातत्याने मोकाट भटके कुत्री ही वृद्ध, लहान मुलांवर हल्ले करून जखमी करत आहेत.रोज सायंकाळी गावातील मोकाट जनावर गडचिरोली- चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिस स्टेशन सावली ते नाक्यापर्यंत मोठ्या संख्येने बसून असतात त्यामुळे अपघात होत आहेत.म्हणून मोकाट जनावरांचा आणि भटके कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी सातत्याने सावलीकर मागणी करीत आहे.

रात्री भटके कुत्रे वाहनांमागे धावत येऊन हल्ला करीत असतात. वारंवार नगर पंचायत कडे मागणी करूनही नगर पंचायत लक्ष देत नाही. त्यामुळे भटके कुत्रे व मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे.
भटके कुत्र्यानी हल्ला करून अनेकांना गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे तातडीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सावलीकर करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये