ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी सायन्स महाविद्यालयात नवमतदार शिबीर संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात दिनांक 24 आगस्ट रोज गुरूवारला नवमतदार नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसील कार्यालय कोरपण्यातून पटवारी अन्सारी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन महाविद्यालयाचे नोडल अधिकारी ग्रंथपाल श्री मनोहर बांद्रे यांनी केले. येणाऱ्या काळात लोकसभेच्या, विधानसभेच्या तसेच स्थानिक निवडणूक होऊ घातल्या आहेत त्यामध्ये ज्यांचे १८ वर्षे पूर्ण झालीत असे कुणीही नाव युवक युवती मतदाराच्या अधिकारापासून वंचित राहू नये म्हणून महाविद्यालयीन स्तरावर हा कार्यक्रम घेण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी महाविदयालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. मनोहर बांद्रे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तसेच सर्व पाहुण्यांचे, अध्यक्षाचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये