ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बालाजी महाराज यात्रेला आलेल्या भाविकांना कॉग्रेस पक्षाचे वतीने मसाले भातचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

बालाजी महाराज मंदिरात आयोजित केलेल्या लळित कार्यक्रमात शहरात आलेल्या भाविकांना काँग्रेस पक्षाचे वतीने मसाले भात चे वितरण संतोष टॉकीज च्या समोर मंगळवारी रात्री करण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते मनोज कायंदे,शहर अध्यक्ष विष्णू झोरे,तालुका अध्यक्ष गजानन काकड,रमेश कायंदे,डॉ इक्बाल कोटकर,डॉ सुनील नागरे,हनिफ शाह, प्रा अशोक डोईफोडे, सत्यनारायण पावले,नासेर भाई,इस्माईल बागवान,ओम कासारे,संतोष कासारे,आकाश कासारे,अविनाश झोरे,संतोष वासुबे,मलकाप्पा लंगोटे, आदी उपस्थित होते,
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर अध्यक्ष विष्णु झोरे,निखिल जायभाये,आकाश कासारे,अविनाश झोरे,संतोष वासुबे,यांनी परिश्रम घेतले.

काँग्रेस पक्षाचे वतीने आयोजित केलेल्या महाप्रसाद चा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.

बसस्थानक ते बालाजी मंदीर पावतो च्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, बँक यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला होता.

दर्शनासाठी भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात होती,
शांतता व सुव्यवस्था च्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये