ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारशिवनी येथे भव्य श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरांची उभारणी

हुतात्मा स्मारक, डिजिटल वाचनालय, ग्रीन जिम, योगासन वर्ग, हॉल सह सर्व विविध उपक्रम नि:शुल्क

चांदा ब्लास्ट नागपूर (प्रतिनिधी)

स्पार्क फाउंडेशनच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी पारशिवनी पेंच मार्गावर स्वर्गीय फकिराजी पोटभरे व सुमित्राबाई पोटभरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरांची उभारणी करण्यात येत असून मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे. उत्तरायण लागताच पांडुरंग व रुख्मिणी मातेची विधिवत स्थापना होणार आहे. सोबतच शिवलिंग व हनुमानजींच्या मूर्तीची विधिवत स्थापना होईल, अशी माहिती स्पार्क फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य गजानन पोटभरे यांनी दिली.
धार्मिक भावनेसोबतच भाविकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत राहावी यासाठी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे. आरोग्यासाठी रामचंद्र मिशनच्यावतीने योगासनाचे वर्ग, श्री श्री रविशंकर यांचे आर्ट आॅफ लिव्हिंगचे वर्ग, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अध्ययनाची सोय व्हावी यासाठी मंदिर परिसरात डिजिटल वाचनालय, युवकांच्या उत्तम आरोग्यासाठी ग्रीन जिम बांधण्यात येणार असून मंदिराच्यावतीने सर्व उपक्रम नि:शुल्क राहतील.
मंदिराच्या बांधकामासोबत सर्व सोयींनी सुसज्जित दोन हजार पाचशे चौरस फुटाचा हॉल बांधण्यात येत आहे व सोबतच लॉन तयार करण्यात येत आहे. या लॉनचे नाव सुमित्रा लॉन असे ठेवण्यात येणार आहे. हॉल सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी, मानवतेच्या उत्थानाच्या हेतूने होणाºया वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी मोफत देण्यात येणार आहे. श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर भविष्यात कोणा एकट्याची संपत्ती राहू नये मंदिराला सार्वजनिक स्वरूप यावे तसेच सर्व मानवधर्माचा सहभाग वाढावा म्हणून योग्यतेनुसार कोणीही मंदिरासाठी दान देऊ शकतात, असे आवाहन स्पार्क फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य गजानन पोटभरे यांनी केले आहे.
या मंदिराच्या निर्मितीसाठी अ‍ॅड. शंकरलाल परदेशी, शालिक व्यास, श्रीराम फकीराजी पोटभरे, सौ. हिमांगी पोटभरे, कमांडर तन्मय पोटभरे व कॅप्टन पल्लव पोटभरे यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये